शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय

खरी शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडेही दोन्ही गटाने दावा केला आहे. शिंदे-ठाकरे या वादाबाबत सुप्रीम कोर्टात आज घटनापीठाकडे सुनावणी घेण्यात आली. एखाद्या गटाला मान्यता नसेल तर त्यावर निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो असा सवाल ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात उपस्थित केला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे. निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत कार्यवाही करण्यास मंजुरी द्यायची का, याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. मात्र सुनावणी दरम्यान शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ४० आमदार आणि १६ शिवसेना खासदारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे.

सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी १९७१ च्या सादिक अली प्रकरणाचा दाखला देण्यात आला. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद झाल्यानंतर घटनापीठानं १० मिनिटांचा ब्रेक घेतला आहे. ५ न्यायमूर्तीचं हे घटनापीठ आहे. शिंदे गट- ठाकरे गटात आतापर्यंत ठाकरे गटाने युक्तिवाद केला आहे. अद्याप शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला युक्तिवाद सादर करायचा आहे. त्यामुळे या सुनावणीला विलंब होणार आहे.

Team Global News Marathi: