शिंदे गटाचे आमदार संजय संजय शिरसाट यांच्यावर सचिन खरात यांची खमखमीत टीका

 

बंडखोरी केलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. याचा श्रीगणेशा शिंदे गटातील एक आमदार संजय शिरसाटयांच्या कार्यालयापासून झाला आहे. दरम्यान, त्यांच्या या कृतीवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी जोरदार टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नयेत अन्यथा औरंगाबादची आंबेडकरी जनता तुम्हाला घरी बसवेल, असा कडक इशारा खरात यांनी दिला आहे.

शिरसाट यांच्यावर टीका करताना खरात म्हणाले की, शिरसाटजी लक्षात ठेवा संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला माणूस बनवले. मात्र तुम्ही आंबेडकर चळवळीचे सुद्धा होऊ शकलात नाही. शिवसेनेने तुम्हाला आमदार केलं, परंतु तुम्ही त्या शिवसेनेचे सुद्धा होऊ शकलात नाही. बाबासाहेबांनी भारतातील सर्व नागरिकांना समानतेचा आणि मानवतेचा विचार दिला. मात्र तुम्ही हिंदुत्ववाच्या विचारचं पुरस्कार करतांना स्पष्टपणे दिसत असून, ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे खरात म्हणाले.

बाबासाहेबांनी आरक्षण दिले म्हणून शिरसाट औरंगाबाद येथून निवडून आले आहेत. अन्यथा ते कधीच निवडून आले नसते. संजय शिरसाट अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले दिसत आहे. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना औरंगाबाद येथून यापुढे आंबेडकरी जनता कधीही निवडून देणार नसल्याचं, सचिन खरात म्हणाले आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात लावण्यात आलेल्या फोटोमध्ये मोठा बदल केला आहे. शिरसाट यांच्या कार्यालयात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या बाजूला आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो काढण्यात आला आहे. सोबतच उद्धव ठाकरेंच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

Team Global News Marathi: