सुप्रिया सुळे यांच्या टीकेला आता शिंदे गटाच्या आमदाराचे सडेतोड प्रतिउत्तर !

 

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार नाही.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य सरकाकरची थट्टा उडवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेयांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली. सध्याचं सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए… असं दोघांसाठी दोघांचच बनलेलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मात्र एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी सुप्रिया सुळे यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. सध्याचं सरकार एक दुजे के लिए असेल तर महाविकास आघाडी सरकारमध्ये अकेले हम, अकेले तुम अशी स्थिती होती. उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकेकट्याने कारभार पाहात होते, मात्र सध्याचं सरकार संगनमतानं काम करतंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं शिरसाट म्हणाले.

एकनाथ शिंदे सरकारवर टीका करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्याच खासदाराने सांगितलं. एक दुजे के लिये सरकार आहे. दोनच लोकांचं सरकार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. माझ्याच लोकसभा मतदार संघात काही कामांसाठी पालकमंत्र्यांकडे जातो. प्रशासनाला निर्णय घ्यायला पर्याय नाही.

Team Global News Marathi: