“शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे अन् .” अंबादास दानवेंनी लगावला टोला

 

एकनाश शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. या सत्तासंघर्षानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद खूप पेटला असून सुप्रीम कोर्टात पोहचला आहे . काल याप्रकरणावर सर्वोच्य कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

मात्र या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कडून निकाल लागला आणि ठाकरेंनी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.या प्रकरणावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने जो निकाल दिला. त्यावरून शिंदे गट आनंदी आहे. परंतू शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. खरं यश शिवसेनेला मिळेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपेक्षाभंग झालेला नाही, आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी याठिकाणी व्यक्त केला.

Team Global News Marathi: