लेन्सवरील कव्हर न काढताच करत होते फोटोशूट? विरोधकांच्या टीकेला भाजपचे प्रतिउत्तर

 

नवीदिल्ली | मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शनिवारी सकाळी ८च्या सुमारास नामिबियाहून विशेष बोईंग ७४७-४०० विमानाने चित्त्यांचे आगमन झाले. ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरने श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणले. उद्यानात एक मंच तयार करत त्याच्या खाली चित्त्यांचे पिंजरे ठेवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० वाजता पिंजऱ्याचे दार उघडून तीन चित्त्यांना सोडले. त्यांनी या ठिपकेदार प्राण्याची छायाचित्रे एका व्यावसायिक कॅमेऱ्यातून टिपली. उर्वरित पाच चित्ते इतर मान्यवरांनी सोडले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्री भुपेंदर यादव होते.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा छेडछाड करण्यात आलेला एक फोटो ट्विटरला शेअर करत त्यांची खिल्ली उडवली आहे. यानंतर भाजपाने त्यावर प्रत्युत्तरही दिलं. भाजपाने हा फोटो खरा नसल्याचं सिद्ध करत तात्काळ उत्तर दिलं. भाजपा नेते सुकांता मजुमदार यांनी फोटोमध्ये निकॉनचा कॅमेरा असून कॅनॉनचं कव्हर दिसत असल्याचं लक्षात आणून दिलं.

“तृणमूलचे राज्यसभा खासदार निकॉनच्या कॅमेऱ्यावर कॅनॉनचा कव्हर असणारा एडिटेड फोटो शेअर करत आहेत. खोटा प्रचार करण्याचा किती हा वाईट प्रयत्न आहे. ममता बॅनर्जींनी किमान थोडी माहिती असणाऱ्यांना तरी कामावर ठेवावं,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: