शीना बोरा हत्याकांडाचे परमबीर सिंह कनेक्शन समोर आली माहिती

 

शीना बोरा हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शीना बोरा बेपत्ता झाल्याची माहिती 2012 साली सर्वात अगोदर आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांना देण्यात आली होती. शीना बोराचा मित्र राहुल मुखर्जी याने कोर्टात जबाब नोंदवला. या वेळी त्याने ही माहिती कोर्टाला दिली आहे. राहुल मुखर्जी आपल्या जबाबात म्हणाला, परमबीर सिंह यांनी मला शीना बेपत्ता असल्याची तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलीस स्थानकात गेलो परंतु पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. परमबीर सिंह माझ्या आईचे चांगले मित्र आहेत.

या प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असून शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जीची महत्वाची साक्ष नोंदवली जात आहे. मागील सुनावणीदरम्यान, राहुलला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो अनुपस्थित राहिला होता. त्यानंतर गुरूवारी तो मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर हजर झाला. 17 जूनला होणा-या पुढील सुनावणीतही राहुलची साक्ष सुरू राहील.

दरम्यान राहुलने आपल्या जबाबात पुढे हे देखील स्पष्ट केले की, तक्रार नोंदवण्यास परमबीर सिंह यांनी खास मदत केली नाही. 2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातल्या जंगलात शीना बोराचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी परमबीर सिंह हे कोकण विभागाचे महासंचालक होते. शीना बोराचा मृतदेह हा रायगड जिल्ह्यात सापडला होता.

Team Global News Marathi: