शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप होणार लाँन्च

शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त ढगातून बरसणाऱ्या अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो यामुळे त्यांच्यासाठी मागच्या तीन वर्षांपूर्वी हवामान विभागाने मेघदूत नावाचे मोबाईल अॅप काढले आहे. दरम्यान त्यामध्ये हवामान विभागाने काही बदल केले आहेत. सगळ्याच महत्वाचे म्हणजे याद्वारे आपल्याला आता दर तीन तासांनी हवामानाच्या गंभीर इशाऱ्यांची तातडीने माहिती मिळणार आहे. तसेच शेतीवरील आधारित अन्य गोष्टींचीही माहिती मिळणार आहे.

दरम्यान या अॅपद्वारे मिळणारी माहिती आणि सल्ले देशातील 732 जिल्ह्यांतील 1हजार 19 स्थानकांवरून एकत्रित केली जाणार आहे. तसेच मेघदूत अॅपवर दर मंगळवार आणि शुक्रवारी द्वि-साप्ताहिक हवामान सूचना अपडेट केल्या जाणार आहेत. ते संबंधित भौगोलिक क्षेत्रावरील अल्प-मुदतीच्या आणि विस्तारित-श्रेणीच्या (एक पंधरवड्याच्या) हवामान अंदाजांवर आधारित असणार आहेत.

हवामान खात्याने ग्रामीण कृषी मौसम सेवे अंतर्गत स्थापन केलेल्या एकूण 330 कृषी नेटवर्क चालवते, जे भारतातील सर्व प्रमुख भाग कव्हर करण्यासाठी माहिती संकलित करते असते. कृषी विभाग राष्ट्रीय, राज्य, जिल्ह्यासह तालुका स्तरावर इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये दर मंगळवार आणि शुक्रवारी हवामान खाते माहिती प्रदर्शीत करत असते.

जिल्हा आणि तालुका स्तरावर आगामी पाच दिवसांसाठी संभाव्य तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि त्याची दिशा याबद्दल शेतकऱ्यांना अपडेट मिळणार असल्याने त्यांना सजग राहता येणार आहे. हवामानातील बदलांसाठी आणि तालुका किंवा जिल्ह्यांवरील महत्त्वाच्या हवामान अंदाजा आदी कोणत्याही महत्वाच्या हवामान बदलाबाबत सल्ल्यासाठी या अॅपमध्ये बदल केले आहेत

Team Global News Marathi: