शेतकऱ्यांकडून माजी कृषीमंत्री दादाजी भुसे याना ‘महादगलबाज पुरस्कार

 

राज्यात मान्सूनला उशीर होत असल्यामुळे राज्यातील शेतकरी आभाळाकडे पाहत बसला आहे. तर दुसरीकडे राज्याचे माजी कृषी मंत्री आमदार दादा भुसे मात्र बंडखोरी करत गोव्यात हॉटेलमध्ये बसले असल्याचा रोष शेतकरी व्यक्त करत असून घणाघाती टीकेचा सामना भुसे यांना करावा लागत आहे.


दादा भुसे यांनी बंडखोर केल्याने राज्यासह त्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांना ‘महादगलबाज पुरस्कार’ देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी ठरवले असल्याचे सांगण्यात आले आहे. मान्सून राज्यातील काही भागात नसल्याने शेतकरी पेरणीच्या प्रतिक्षेत आहे तर अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. या दरम्यान खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने आर्थिक विवंचनेतही शेतकरी सापडला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी लिंकींगही देत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण पाहणार हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे आणि राज्यातील कृषी मंत्री चैनी करत असल्याचा राग शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कृषी मंत्री असताना दादा भुसे यांनी बळीराजाचा द्रोह केल्याचेही शेतकरी म्हणाले. जसा स्वताच्या पक्षाशी द्रोह केला त्यापेक्ष्या अधिक बळीराज्याशी केला आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची ही कृती दगलबाजी असल्याने कृषक समाज कार्यकर्त्यांनी या कृतीचा निषेध करीत कृषिमंत्री भुसे यांना”महादगलबाज” पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आला असल्याची माहिती कृषक समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: