हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन”; रुपाली चाकणकर यांचे उद्धव ठाकरेंना समर्थन

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर आता शिंदे गट आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांचे सरकार राज्यात स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, अशा काही ओळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिल्या आहेत. याशिवाय रुपाली चाकणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली. होती. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरींच्या हालचालींबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तब्बल ४ वेळा क्लपना दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी कोणत्याच हालचाली न केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Global News Marathi: