शेलार म्हणतायत ‘आमचे चुकले असेल तर सुधारू’, संजय राऊतांनी लगेच दिले उत्तर !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळाले होते. त्यातच राज्यात सुरु असलेल्या विविध मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी सुरु झालेली आहे. ‘ संजय हा सर्वव्यापी आहे. आमचे चुकले असेल तर सुधारू, हा प्रस्ताव नाही हे मनोगत आहे’ असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे या टीकेला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

‘एका चिडीतून हे सरकार निर्माण झालंय. त्यात आग ओतण्याचे काम करू नका’ असं म्हणत संजय राऊत यांनी आशिष शेलार यांचा प्रस्ताव निकाली काढला. TV पत्रकारांचा “न्यूज रूम लाईव्ह” या दिवाळी अंकाचे प्रकाशन शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दोन्ही नेत्यांची चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली.

या कार्यक्रमात पत्रकारांना नोबेल मिळाला आहे. (यावर राऊत बोलले की नो बेल) राज्य सरकारने पत्रकारांसाठी नो-बेल मिळण्यासारखे वागू नये. राऊतांकडे बघून वाटते. कभी कभी मुझे लगता है की इस आदमी का क्या करे. तुम्ही तीनचाकी गाडी बनवली पण चालक नाहीये तुम्ही. राऊत साहेब तुम्ही लई भारी माणूस आहात. तीन पक्षांचे तुम्ही सरकार बनवले हे स्वप्नातही वाटले नाही. तुम्ही केलेले आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

भगवा बॉम्ब फुटू द्या. संजय हा सर्वव्यापी आहे. आमचे चुकले असेल तर सुधारू प्रस्ताव नाही हे मनोगत आहे. निधड्या छातीचा हा मित्र आहे. मतमतांतर आहेतच, असंही शेलार म्हणाले. तर, एका चिडीतून हे सरकार निर्माण झालंय. त्यात आग ओतण्याचे काम करू नका. पुन्हा आग भडकेल, असं म्हणत संजय राऊत यांनी आशिष शेलार यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.

Team Global News Marathi: