शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापुरात होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

कोल्हापूर | शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच कोल्हापुरात दाखल झाले होते.

ज्येष्ठ नेते विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांचे काल निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.

आज दुपारी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. तसेच एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शाहू कॉलेजच्या पटांगणारवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Team Global News Marathi: