साताऱ्यात भाजपाचे निवेद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मारहाण’ करण्याची धमकी तसेच गलिच्छ भास वापरल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली. या बाबतची तक्रार भाजपा जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली.

तक्रारीत म्हणले आहे की, देशाचे पंतप्रधान हे भारतीय राज्य घटनेनुसार सर्वोच्च पद आहे. त्यांची सुरक्षितता हा सर्व भारतीय व सुरक्षा यंत्रणांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतेही गैरविधान, गैरकृत्य हे देशाच्या तसेच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षे विषयी उचल्लेले विरूध्द पाऊल असते. अशाा नेत्या विषयी जाणीवपुर्वक अपशब्द वापरणे, त्यांना मारहाण करण्याची भाषा वापरणे, त्यांच्या हत्तेचा कट रचने या सर्व बाबी देशद्रोहाच्या गुन्हयामध्ये मोडतात.

राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष, नाना फाल्गुनराव पटोले, आमदार भंडारा विधानसभा यांनी काल दि. १७/०१/२०२२ रोजी भंडारा येथे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशुन, मी मोदीला मारू शकतो’, शिव्याही देऊ शकतो, असे असंसदीय, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व देशाचे पंतप्रधान यांच्या विषयी त्यांना शारिरीक इजा पोहचविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांना हाताशी धरून कटकारस्थान रचले आहे हे स्पष्ट होत आहे असे पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे प्रस्तुत घटनेचे गांभीर्य व देशाच्या अंतरिक सुरक्षेचा मुद्दा समजून आपण सदर नाना फाल्गुनराव पटोले यांच्या विरूध्द योग्य त्या दंडनिय कलमांच्या अनुषंगाने पंतप्रधानांना धमकावणे, जीवे मारण्याचा कट रचणे, सामाजिक अशांतता पसरविणे, जमावास गुन्हा करणेसाठी प्रवृत्त करणे, देशा विरूध्द कट रचणे इ. सत्वर कायदेशीर कारवाई करावी ,एफ आय आर दाखल करून त्यांना अटक करावी असेही तक्रारीत म्हणले आहे.

Team Global News Marathi: