शत्रुघ्न सिन्हांनी भाजपात प्रवेश केलेल्या मिथुनला चक्रवर्ती यांना दिला महत्वाचा सल्ला

पश्चिमबंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रमुख लढत होणार आहे. त्यात अनेक मतबल नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला चितपट करण्यासाठी भाजपने संपूर्ण तयारी केली आहे.

त्यातच ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी प्रवेश केल्यानंतर प्रथमच विरोधी पक्षाचा अर्थात तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. त्यांनी केलेली टीका मात्र अनेकांच्या पचनी पडली नव्हती.

यावर आता त्यांचे मित्र, प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेस खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी खडेबोल सुनावले आहेत. सिन्हा आज नागपुरात होते. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत. लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. मात्र, पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू, कोब्राची भाषा बोलायला नको होती. ते राजकीय बोलले असते तर चांगलं झालं असतं”, अशा शब्दात सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकीय सल्लाच दिला आहे.

Team Global News Marathi: