कोकणातील ‘आंब्या’ला चांगले दिवस, डझनचा दर पाहून आपण व्हाल चकित; वाचा सविस्तर

मुंबई | सर्वांनाच आवडणारे फळ म्हणजे आंबा, आणि आंब्याचा सिझन आला की लगेच आठवते कोकणातील हापूस मात्र याच कोकणातील हापूस आंब्याला सोन्याचे दर आल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणातील आंबा पिकविणारे शेतकरी मात्र खुश पाहायला मिळत आहेत. राजापूरमधील आंबा शेतकरी बाबू अवसरे यांच्या एक डझन हापूस आंब्याला चकित करणारा भाव मिळाला आहे.

त्यांच्या एक डझन आंब्याला तब्बल १ लाख ८ हजार रुपये बोली देण्यात आली आहे. त्यामुळे सगळेच चकित झाले आहेत. कोकणातील १० शेतकऱ्यांच्या आंब्याचा लिलावाचा कार्यक्रम पार पडला, यामध्ये प्रवीण दरेकर यांनी प्रति डझन २५ हजार रुपये देऊन ४ पेट्या खरेदी केल्या तर बाबू अवसरे यांना राजेश अथायडे यांनी १ लाख ८ हजार रूपये दर देऊन सर्वांनाच चकित केले आहे. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सोन्याचे दिवस असल्याचे पाहायला मिळाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: