शार्जील प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी लगावला शिवसेनेला टोला

पुण्यात एल्गार परिषदेत शार्जील उस्मानी यांनी हिंदू देव-देवितांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्या या विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. यावर आघाडी सरकारने कारवाई करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र अदयाप शार्जीलवर कारवाई करण्यात आलेली नाही याच मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शर्जील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे, अशा शब्दांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. चंद्रकांत पाटील आपल्या एका ट्विटमध्ये म्हणतात, शर्जीलच्या अटकेसाठी प्रत्यक्षात या महाभकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून शर्जील उस्मानीला अटक झाल्यास त्याला त्वरित जामीन कसा मिळेल हेच या सरकाराचे प्राधान्य दिसत आहे असे त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: