मध्यप्रदेश सरकारचा महाराष्ट्रातून येणा-जाणाऱ्या बससेवेला स्थगिती

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लादले गेले आहे.

दरम्यान आता महाराष्ट्राजवळील राज्यांनीदेखील खबरदारी घ्यायाला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद कऱण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद ठेवली जाणार आहे. २० मार्चपासून बससेवा बंद होईल. त्यामुळे या दोन्ही राज्यात जाता येता येणार नाही.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा आलेख वेगाने वाढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २५८३३ नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे अशी शक्यता जाणकार वर्तवत आहे.

Team Global News Marathi: