शरद पवारांच्या रिमोटव्दारे घोटाळे होत आहेत, त्याचं उत्तर द्यावं – किरीट सोमय्या

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यातच आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले होते तसेच आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही असे सुद्धा विधान त्यांनी केले होते.

सोमय्या म्हणाले की “अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत आहे”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये हिम्मत असली पाहिजे. शरद पवारांच्या रिमोटव्दारे घोटाळे होत आहेत, त्याचं उत्तर द्यावं. त्यांच्या स्टेटमेंटची किंमत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सेशन कोर्टापासून कुठल्याच कोर्टाने हात धरला नाही, त्यामुळे मान्य करा की तुम्ही घोटाळे करत आहात, असा हल्लाबोल सोमय्यांनी केला.

 

Team Global News Marathi: