शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबईतील चेंबुरचे रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डी. एस. सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी हा गुन्हा दाखल केला आहे.

सावंत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका फेसबुक युजर्सने शरद पवार यांचे काही आक्षेपार्ह फोटो शेअर केले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. यासह निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही पवार यांची तीन वेळा भेट घेतली होती. या बैठकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरा मोर्चा तयार करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच विरोधकांनी त्यांच्यवर जोरदार टीका केली होती.

Team Global News Marathi: