थोरातांवर केलेल्या टीकेचा लेकीने घेतला समाचार, गोपीचंद पडळकरांना शिकवले संस्कार |

 

मुंबई | राज्यात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत होता. या दोन्ही आरक्षणाच्या मुद्द्यांवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं विधान केलं होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत टोला लगावला. त्यामुळे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोरातांवर टीका केली. मात्र पडळकरांनी वापरलेली भाषा न पचणारी होती. तसेच त्याच्या टीकेला आता मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी जोरदार टोला लगावला आहे.

“महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही,” असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांना ट्विटरवरुन टोला लगावला होता. त्यानंतर, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी पडळकर यांना संस्कारी भाषेत टोला लगावला.

पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, असे ट्विट शरयू यांनी केलं आहे. भाजपा आमदाराने आपल्या वडिलांवर केलेली टीका न पटल्याने शरयू देशमुख यांनी ट्विटरवरुनच पडळकर यांना प्रत्यु्त्तर देताना संस्कार शिकवले आहेत. आता या टीकेला पडळकर काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Team Global News Marathi: