शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरातील गणपतीचं बाहेरूच दर्शन घेतलं. त्यानंतर यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. सोशल मीडियावरही या दर्शनाची जोर्र्दार चर्चा रंगली. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मनसैनिकांनी आता पुन्हा एकदा या दर्शनावरुन राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सोशल मीडियातून बाहेरुन केलेल्या दर्शनावर टीका केली आहे.

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी शरद पवार दर्शन घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच ते भीडे वाड्याचीही पाहणी करणार होते. मात्र, त्यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं. दरम्यान, त्यांनी मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नसल्याचं पुण्याच्या शहराध्यक्षांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर, मनसेनं शरद पवारांच्या या दर्शनावरुन टीका केली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन पवारांना टोला लगावला आहे. विशेष म्हणेज त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही शरद पवारांचं नाव घेतलं नाही. पण, त्यांनी पावसातील भाषणाचा संदर्भ इथं दिला आहे.

”पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे”, असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून मनसेचे इतर काही नेतेही शरद पवारांवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार बृजभूषणसिंह यांच्यासमेवतच्या फोटोवरुनही मनसे विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगला होता.

 

Team Global News Marathi: