‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका

 

शिवसंपर्क अभियान अंतर्गद आज शिवसेना खासदार संजय राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता तसेच विविध प्रश्नांना प्रतिउत्तर सुद्धा दिले होते. यावर छत्रपती संभाजी राजेंच्या उमेदवारी बद्दल बलताना राऊत म्हणाले की, छत्रपतींच्या गादीबद्दल प्रेम आहे आणि राहिल. परंतू राज्यसभेबाबतचा विषय संपला असल्याचे खासदार संजय राऊतांनी कोल्हापुरात स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना हा छत्रपती घराण्याला आदर देत नसल्याचा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला असता, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या एकट्याच्या मालकीचे नाहीत. ते संपुर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत हे लक्षात घ्या असेही ते म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अशातच शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केल्याची टीका केली होती याबाबत राऊतांना सवाल करण्यात आला.

शिवेंद्रराजे यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना राऊत म्हणाले की, ते अपक्ष आहेत का? असा सवाल केला. त्यांनी किती पक्ष बदलले? पक्षाचे काय वावटे आहे का? तुमच्या घराण्यातील किती जणांनी पक्ष बदलले. आम्हांला तोंड उघडायला लावून का असा इशाराच शिवेंद्रराजे भोसलेंना दिला. तसेच शरद पवार आणि ठाकरे यांच्यावर रोज टीका करणाऱ्यांची मन शुध्द नाहीत. ही एक विकृती आहे. त्यात त्यांना काय आनंद मिळतो कोणास ठाऊक असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबाबत विचारल्यानंतर ते छत्रपतींचे वंशज आहेत का अशी विचारणा राऊतांनी केली.

Team Global News Marathi: