व्यसनामुळे पक्षाच्या अध्यक्षाचं तोंड कापावं लागलं तुषार भोसले यांची पातळी सोडून शरद पवारांवर टीका

 

मुंबई | सध्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फेरी अजुन कमी झालेल्या नाही. त्याचवेळी भाजपच्या नेत्यांकडून सरकारवर आणि राष्ट्रवादीवर टीका करण्यात येत आहेत. मात्र आता भाजपच्या वारकरी आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर खालच्या थराची टीका केली आहे.

तुषार भोसलेंनी ट्विट करत म्हटलं की, व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है. तुषार भोसलेंच्या खालच्या थराच्या टीकेवर अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या ट्विटमुळे वाद होण्याची शक्यता आहे.

रास्तवराडीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एन्सीएबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लगावलेल्या आरोपणानंतर राज्यात एकाच खळबल दुलई होती एकीकडे महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांना पाठिंबा देताना दिसून आले होते तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा समीर वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केला होता मात्र वानखेडे यांनी चौकशीला सामोरे जावे असे विधान सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते/.

Team Global News Marathi: