एका महिलेशी कसं बोलावं हे पवारसाहेबांनी शिकवलं नाही का ? – नितेश राणे

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले आहेत तसेच त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो शेअर करून त्यांच्या जात प्रमाणपत्रावर काही प्रश्न उपस्थित केले होते याच मुद्द्यावरून वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी थेट मालिकांना आव्हान दिले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मालिकांच्या सामर्थनात उतरून त्यांनी क्रांती रेडकर यांच्यावर भाष्य करताना अभद्र भाषेचा उपयोग केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर क्रांती रेडकर यांची बाजू घेताना निलेश राणे आव्हाड यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं आहे. एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का? पवारसाहेब हे आपले संस्कार?, असा प्रश्न आव्हाडांवर टीका करताना राणे यांनी पवार यांना केला आहे.

निलेश राणे म्हणाले की, इतर वेळेला दुसऱ्यांची संस्कृती काढतात पण मला खात्री आहे की पवारसाहेब यावर काही बोलणार नाही. एका पेक्षा एक फालतू लोक भरलेत राष्ट्रवादी पक्षात, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे. सध्या राज्यासह देशात आर्यन खान प्रकरण चांगलंच गाजत आहे. समीर वानखेडे यांच्या बाजूनं सध्या भाजपचे नेते मैदानात उतरताना दिसत आहेत.

Team Global News Marathi: