शरद पवार यांनी करोना लसीचा घेतला दुसरा डोस, ट्विट करून दिली माहिती

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी आज कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस टोचून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचे पित्ताशयात खडे झाल्यामुळे यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते घरी विश्रांती घेत होते. यामुळे शरद पवारांनी निवासस्थानीच करोनाचा दुसरा डोस घेतला.

शरद पवारांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,’ असे ते म्हणाले आहेत. यापूर्वी शऱद पवारांनी १ मार्चला करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन त्यांनी करोनाची लस घेतली होती.

Team Global News Marathi: