“शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले” मोदींचा तो व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी केला शेअर

 

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्दयावरून भाजपाने थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केले होते तसेच पवारांवर थेट दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता अशातच आता या टीकेला राष्ट्र्वादीने सुद्धा पंतप्रधान मोदी यांचा जुना व्हिडिओ शेअर करून सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला व्हिडीओ राष्ट्र्वादीने शेअर केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक झाल्यापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. त्यानंतर मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांचे नाव दाऊदशी जोडले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून पवारांचे संबंध दाऊदशी जोडण्यात आले.

तर दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला असून व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, ‘एक दशक होत जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड च्या ताब्यात गेली. तर काय होईल, असा प्रश्न होता. त्यावेळी शरद पवार यांनी हिंमत आणि कौशल्याने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं.’ असे वक्तव्य मोदींनी केले होते.

सदर या व्हिडिओवर अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ?ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी, असे कॅप्शन जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे यांनी ‘अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो’, असे वक्तव्य केले होते यावरूनच राष्ट्रवादीने राणे यांना प्रतिउत्तर दिले आहे.

 

Team Global News Marathi: