त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा आघाडीला सल्ला

 

पुण्यातील डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न एका तरुणीने केला असल्याची माहिती शनिवारी उघडकीस आली होती. यावेळी तरुणीने फेसबुक पोस्ट करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, ‘हाच तो हरामखोर बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक. ज्याने एका मुलीवर बलात्कार केला आणि जबरदस्तीने गर्भपात ही करवला. न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं स्वत:ला संपवते म्हणत या तरुणीने काल फेसबुक पोस्ट केली होती. अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाहीये. ती गायब आहे,’ असा घाणाघाती आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

‘कुठे गेलीये ती मुलगी की यानेच तिला गायब केलं आहे?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. ‘या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका. मुख्यमंत्री महोदय आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका, त्याआधी तिला वाचवा,’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Team Global News Marathi: