शिवसेना आमदाराच्या विरोधात रिक्षा चालकाची तक्रार |

 

औरंगाबाद | रिक्षाचालक मारहाण प्रकरणी चालकाने शिवसेना आमदार अंबादास दानवे विरोधात थेट पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. सोमवारी दुपारी क्रांती चौकमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरलेले होते.

मात्र यावेळी आमदार दानवे यांनी रिक्षाचालक अजय अशोक जाधव याना मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करुन आपली समाजात बदनामी केल्यामुळे मानहानी झाली आहे. काही एक चुक नसताना आमदाराने पोलिसांच्या समोर आपल्याला मारहाण केली असा आरोप त्यांनी केला आहे.

औरंगाबादेत वाहतूक कोंडी सोडवताना ऐकत नसलेल्या रिक्षा चालकाला आमदारांनी फटका दिला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी या रिक्षा चालकाला कानाखाली मारली होती, चार वाजता सर्व व्यवहार बंद होणार म्हणून औरंगाबादच्या रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यात शहरातील क्रांती चौकामध्ये ट्रॅफिक जाम झाले होते.

ट्रॅफिक क्लियर करण्यासाठी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरले मात्र ऑटो चालक आणि वाहतूक कोंडी करीत आहे हे पाऊण त्याला समाज देत असताना उलट भाषा वापरल्यामुळे दानवेंनी रिक्षा चालकाला सेना स्टाईलने उत्तर दिले.

Team Global News Marathi: