“शरद पवारांना चांगलं माहिती आहे की.’ – देवेंद्र फडणवीसांनी केले सूचक विधान

मुंबई | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्धा तापलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. पवारांच्या या टीकेवर चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असा गंभीर आरोप केला आहे. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आले असून याबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत सरकारला कारणे सांगायची आहेत. या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही.’ असा आरोप लगावला.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. कुठेही गेलेलं नाही ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातील गेलेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे.’ असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांचा केंद्र सरकारवरील आरोप खोडून काढला.

Team Global News Marathi: