आमदार राजाभाऊंना भगवंत आणि जनतेचे आशीर्वाद -देवेंद्र फडणवीस

आमदार राजाभाऊंना भगवंत आणि जनतेचे आशीर्वाद -देवेंद्र फडणवीस कार्यकुशलतेचं कौतुक

बार्शी – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी, आमदार राऊत यांनी केलेल्या छोटेखानी भाषणातील मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे रुग्णालयासाठी पीएम केअर फंडातून शक्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिले. तसेच, निर्बंध उठताच मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचंय, त्यासाठी आपण पुन्हा बार्शीला येणार, असेही ते म्हणाले.

आमदारपुत्र रणवीर आणि रणजीत यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याची खंत फडणवीस यांनी बोलून दाखवली. तसेच, दोन्ही नवदाम्पत्यांस वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावापुढे आता माजी लावायचं नाही, असे म्हणत त्यांच्यातील कार्यकुशलतेचं कौतुक केलं. तत्पूर्वी आमदार राऊत यांनी राऊत कुटुंबीयांच्यावतीने फडणवीस यांच्यासह सर्वच उपस्थित मान्यवर, आमदार, खासदारांचे आभार मानले. त्यासोबतच, मला माजीचा आजी करण्यात देवेंद्र यांचा मोलाचा वाटा असल्याचंही ते म्हणाले. मी माजी आमदार असतानाही बार्शीसाठी त्यांनी मोठा निधी देऊ केल्याची आठवणही राऊत यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, आमदार राऊत यांनी पुढील काही महिन्यात भगवंत मंदिरासमोरील नवीन स्टेडियमचं उद्घाटन आणि बार्शीतील उद्योजकांच्या काही प्रकल्पांचं भूमीपजून आपल्या हस्ते करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. फडणवीस यांनीही त्यास होकार देत, आगामी काळात लवकरच ही कामे मार्गी लावू असे म्हटले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: