शरद पवार हे तीन जिल्ह्याचे स्वामी, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत – गोपीचंद पडळकर

 

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. त्यात आता पुन्हा पंतप्रधान मुद्द्यावर पडळकरांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे’ असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. त्याचबरोबर मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजासमाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Team Global News Marathi: