शरद पवारांची राज्यपालांवर टीका, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणतात की,

 

पुणे | १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पत्रकारी परसदेत घणाघाती टीका केली होती. राज्यपालांनी मात्र या टीकेवर बोलणं टाळलं. पवार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर टीका करायलाच हवी का?; असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सिंहगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळी पत्रकार माध्यमांनी त्यांना शरद पवारांच्या टीकेवरून प्रश्न विचारले. यावेळी कोश्यारी यांनी या प्रश्नावर हसून मोजक्याच शब्दात उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय टीका करणार? ते आपल्या देशाचे माननीय व्यक्ती आहेत. ते काही बोलले तर आपण त्यांच्यावर टीका करायला हवी का?, असा प्रतिसवाल राज्यपालांनी केला.

यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी सिंहगड किल्ल्यावरील अनुभवही विशद केला. सिंहगड किल्ल्याचा अनुभव चांगला होता, प्रत्येकाने तिथं जायला हवं, असं आवाहन त्यांनी केलं होत. आता राज्यपालांच्या विधानावर राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: