नारायण राणे यांच्यावर भाजपकडून मिशन मुंबई मनपाची जबाबदारी

 

मुंबई | शविसेना पक्षाने भाजपबरोबर काडीमोड गेट राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपाकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपने सुद्धा कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘ मिशन ११४’ ची जबाबदारी सोपविली गेली असल्याचे समजते.

भाजपने राणे यांच्या १९ ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ ला कसा प्रतिसाद मिळतो यावर सर्व लक्ष केंद्रित केले असून भाजपचे चार नेते विविध भागात जन आशीर्वाद यात्रा काढून जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठीची ही मोर्चे बांधणी असल्याचे सांगितले जात आहे.

राणे यांची यात्रा शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. राणे मुंबई विमानतळावरून कुलाबा येथपर्यंत जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. पुढच्या वर्षी मुंबई मनपा निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपला किमान ११४ जागा जिंकून देण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी राणे यांच्यावर सोपविली आहे. शिवसेनेचा पराभव करण्याची जबाबदारी सुद्धा राणे यांच्यावरच आहे. राणे पूर्ण ताकदीनिशी हे मिशन हाती घेत आहेत असे सांगितले जात आहे.

Team Global News Marathi: