‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे सूचक वक्तव्य |

 

सोलापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच या भेटीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सूचक प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक वक्तव्य केलं आहे.

शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट असल्याने आजच्या मोदी -पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही, असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे महाविकास आघाडीतचे ज्येष्ठ नेते आहे. मुळात पवारसाहेब हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे आजच्या मोदी-पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे, असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच पटोले यांच्या स्वबळाच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे. त्यामुळे जवळ आहे तोवर जवळ, नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते, असं सूचक वक्तव्य सुशिलकुमार शिंदेंनी केलं.

Team Global News Marathi: