“शरद पवारांनी त्यांना सर्वकाही दिलं, तरीही त्यांनी राष्ट्रवादी सोडली”

 

शिवसेना पक्षाने आपल्या जुन्या २५ वर्ष जुन्या मित्राबरोबर काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. सरकार स्थापनेवेळी एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घ्यायचे नाही असं ठरवण्यातं आलं होतं. त्यातच आता शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले की, प्रवेश केलेल्या तिघांनी त्यापैकी एकाला पक्षातून बाहेर काढले आहे तर अन्य दोघे पक्षातुन बाहेर पडलेले होते, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले आहेत की, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु, एकमेकांचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करून घ्यायचे नाहीत असं आघाडी करताना ठरलेलं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी एकेकाळी मजबूत होती. गुहागर, खेड आणि रत्नागिरीत आमदार होते. गुहागरचे आमदारांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व काही दिले तरी ते का बाहेर पडले हा प्रश्नचं आहे. भविष्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच जिल्हा संपर्कमंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: