सध्या राज्यात विरोध आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्यात गुंग आहेत. त्यात अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या उदघाटनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा नेत्यांनी टीका करायला सुरवात केली. या टीकेला सुद्धा राष्ट्र्वादीने सडेतोड उत्तर दिले आहे.
मात्र या सर्व टीकेला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अपवाद ठरले आहे. आमदार नीलेश लंके यांनी टीकाकारांना नम्र विनंती केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेने व्यथित झाल्याने लंके यांनी ही विनंती विरोधकांना केली आहे.
जेजुरी येथील कार्यक्रमातील पवार यांच्या भाषणावर अलीकडेच टीका होत आहे. त्यामध्ये पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला, असे वक्तव्य केल्याची क्लीप व्हायरल करून यातून अहिल्यादेवी यांचा अवमान झाल्याची टीका विरोधक करत आहेत.
या टीकेला उत्तर देताना आमदार लंके म्हणाले की, ‘ज्यांच्या राजकीय कारकीर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा देशाच्या नेत्यावर दिशाहीन झालेले लोक टीका करत आहेत. पवार यांच्या जेजुरीतील भाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. देशाचे नेतृत्व करताना येथील सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक अभ्यास पवारांएवढा कोणाचाही नाही असे म्हणत विरोधकांचा संचार घेतला होता.