शपथविधी पार पडल्यानंतर सुद्धा भाजपा कार्यालयात निरव शांतता

 

गेल्या महिन्यापासून ब्रेक लागलेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपकडून एकूण 18 जणांनी शपथ घेतली. पण काही जणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज आहे. भाजपमध्येही याचा पडसाद उमटले आहे. शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडला आहे.

राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकूण 18 मंत्र्यांना शपथ दिली. शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्तार टीईटी परीक्षा घोटाळ्याचे आरोप झाले आहे. तर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतरही राठोड यांनी मंत्रिपद दिले.

भाजपमध्ये मुंबईतील अनेक नेते इच्छुक होते. पण, जुन्याच नेत्यांचा सहभाग करून नव्या इच्छुकांना डावलण्यात आले आहे. तर शिंदे गटामध्ये अपक्ष आणि मित्र पक्षांनाही संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून असलेले संजय शिरसाट यांचाही ऐनवेळी पत्ता कापण्यात आला. त्यामुळे शिरसाट कमालीचे नाराज झाले आहे. औरंगाबादमध्ये एकीकडे भाजपचे नेते जल्लोष करत आहे, तर दुसरीकडे शिरसाट गटामध्ये शुकशुकाट आहे.

Team Global News Marathi: