किमान आता तरी दिल्लीच्या वाऱ्या थांबतील, काँग्रेसने लगावला शिंदे सरकारला टोला

 

शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री मंडळ विस्तार झाला आहे. आता तरी किमान दिल्ली वाऱ्या थांबतील अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कामकाज सुरु करावे, राज्यातील गोरगरिबांना न्याय द्यावा, यासाठी लवकरात लवकर कामकाज सुरु करणे आवश्यक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गेल्या काही दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज ते नाशिकच्या विश्रामगृहावर असताना माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले कि, तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बनले आहे. त्यांना शुभेच्छा तर आजच्या दिवशी देणंच आहे. मात्र हे मंत्री मंडळ कायदेशीर की बेकायदेशीर हे सुप्रीम कोर्ट ठरवेल, इशारा यावेळी थोरात यांनी दिला. तसेच शिंदे मनातरी मंडळात वादग्रस्त असलेले संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळाली. याबाबत ते म्हणाले कि, महीलांबद्दल यांना आपुलकी आहे की नाही? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत की नाही? याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले कि, मंत्री मंडळ तर झाले मात्र महिलांचा समावेश तर सोडाच पण महिलांच्या संदर्भात आरोप असलेल्या व्यक्तिमत्त्वाला मंत्री मंडळात सन्मानाने स्थान देणं योग्य नाही. आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्या संदर्भात आरोप झालेले आहेत, त्याची शहानिशा व्हायला पाहिजे, मंत्रिमंडळ होणार की नाही? याची भीती वाटत होती, कि हे दोघेच सरकार चालवणार की काय असं वाटत होतपण आता पहिला टप्पा का होईना झाला आहे

Team Global News Marathi: