शिवसेनेने संभाजीराजेंची राज्यसभेची उमेदवारी नाकारली यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसून आलं होतं. तसेच अनेकांनी थेट शविसेना पक्षावर घणाघाती टीका करत सेनेवर बोचरी टीका केली होती यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली.
यावेळी राऊत म्हणाले की, ‘शाहू छत्रपतींची आत्मियतेने भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाहू छत्रपतींशी फोनवरून चर्चा केली, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी शाहू छत्रपती महाराजांची भेटी न्यू पॅलेस इथे घेतली. संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयामागे भाजपा असू शकतो, अशी शाहू महाराजांनी काल शक्यता वर्तवली होती.
शाहू महाराजांच्या या भूमिकेचे शिवसेना आणि संजय राऊत यांच्याकडून स्वागत करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकारण झाले. आरोप-प्रत्यारोप झाले. याविषयी संभाजीराजेंच्या समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच एकूणच महाविकास आघाडीवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी मांडली होती.