“जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल सुरू, राहुल गांधी, दीपिका पादुकोण तिथे जातात”

 

नवी दिल्ली | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता योगी आदित्यनाथ सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दिल्लीच्या जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल सुरू आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींसह काँग्रेसचे बडे नेते आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणही तिथे जातात असेही त्यांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे रघुराज सिंह यांनी अमित शाह यांच्या अलीगढ येथील रॅलीदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

“नेहरूंच्या धोरणानुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना झाली. जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कम्युनिस्ट आणि देशद्रोही वाढले आहेत. देशद्रोही तिथे सेक्स स्कँडल चालवतात, ज्यात राहुल गांधी आणि दीपिका पादुकोणसारखे मोठे लोक जातात. तिथे देशद्रोही लोक जमा होत आहेत, पण येणाऱ्या काळात या देशद्रोही शक्तींना ठेचून काढू,” असे वादग्रस्त वक्तव्य रघुराज सिंह यांनी केले आहे.

 

Team Global News Marathi: