“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं”

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही आधी विरोधक सोडताना दिसून येत नाहीये. त्यातच राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधकांनी आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला आहे. आता पुणे एकदा मुंबईतील एका कार्यक्रमात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशनचे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये महापौर भाजपचा बसणार, असा विश्वास देखील सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.

‘आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं’, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Team Global News Marathi: