माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले मराठा व ओबीसी आरक्षण या पांढऱ्या पायाच्या सरकारने घालवला – लोणीकर

 

देगलूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेले आरोप खोडून काढत राज्यसरकारने दलाली खाऊन पिक विमा कंपन्यांचे गुलाम बनले आहेत असा घणाघाती आरोप केला. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पिक विमा कंपन्यांशी केलेला शेतकऱ्यांच्या हिताचा होता म्हणून सातत्याने तीन वर्षे दुष्काळ पडून देखील पिक विमा कंपन्यांनी भरघोस पीक विमा दिला.

 

मात्र महा विकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा करार बदलण्यात आला बदललेल्या करारानुसार पिक विमा कंपन्या प्रशासनाने केलेले पंचनामे मान्य करत नाहीत आणि पीक विमा कंपनीकडे पंचनामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही ऑनलाईन पीक पाणी बहुतांश शेतकऱ्यांना करता आली नाही परिणामी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही राज्य सरकारला सुद्धा पिक विमा कंपन्यांकडून दलाली मिळाली आहे की काय म्हणून राज्यसरकार सुद्धा गप्प आणि पीक विमा कंपन्यांच्या बाजूने आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

निवडणुकीच्या अनुषंगाने अशोकराव चव्हाण शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत असून अशोकराव चव्हाण यांनी “राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करावी आणि प्रायश्चित्त म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि जर असं नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत व यावेळी केंद्रीय मंत्री भागवतजी खुब्बा, साहेब,माजी मंत्री देगलुर विधानसभा प्रभारी बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आ. लक्ष्मण ठक्करवाड , डॉ.अजित गोपछेडे, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Global News Marathi: