आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाई यांचा गंभीर आरोप

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यावर आणि मंत्र्यांवर महिलांचे शोषण तसेच बलात्काराचे आरोप लावण्यात आले आहेत, त्यात आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी एक फेसबूक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.


तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून राष्ट्रवादी पक्षाच्या आनखी एका नेत्यावर महिला लैगिक अत्याचाराचा आरोप लगावला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा तृप्ती देसाई चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाचं, नोकरीचं अमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे देसाई यांनी म्हंटले आहे. तसेच आज पत्रकार परिषेद घेऊन त्या नेत्याचा चेहरा जगापुढे आणणार असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे, मेहबूब शेख तसेच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते.

Team Global News Marathi: