सेनेत गळती अद्याप कायम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही काही तासातच सोडचिट्टी

 

एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं. यादरम्यान शिवसेनेनं कधी भावनिक आवाहन करत तर कधी कायदेशीर लढा देत आमदारांना परत आणण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू केले. मात्र, अद्याप या प्रयत्नांना यश आलेलं नाही. आता शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

शिवसेनेतील गळती थांबण्याऐवजी दिवसेंदिवस आणखीच वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता कोकणातही उद्धव ठाकरेंना दणका बसला आहे. आता नवनियुक्त पदाधिकाऱ्यंनीही काही तासातच राजीनामे देत ठाकरेंना झटका दिला आहे. यामुळे शिवसेनेच संकट आणखीच वाढल आहे. उद्धव ठाकरेंकडील संख्याबळ कमी होताना दिसत आहे. अगदी ग्राऊंड लेव्हलचे कार्यकर्तेही आता एकनाथ शिंदेंना पाठिंबा देताना दिसत आहेत.

रत्नागिरीतील जिल्हाप्रमुखांनी आता आपला पदभार स्विकारण्यास थेट नकार देत उद्धव ठाकरेंना झटका दिला आहे. प्रकाश रसाळ यांनी कौटुंबिक आणि आरोग्याचं कारण देत ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला आहे. रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन नियुक्ती होताच काही तासातच अनेकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत.

बडतर्फ केलेले ११९ कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास

नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत

Team Global News Marathi: