संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी नरेंद्र मोदींचे खासदारांना आवाहन

 

नवी दिल्ली | संसदेच पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान 18 बैठका होणार असून 24 विधेयके मांडली जाणार आहे. या अधिवेशनापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी नरेद्र मोदी यांनी खासदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, खासदारांनी योग्य सहकार्य केल्यास चांगले निर्णय घेता येतील, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, देशाला नवे राष्ट्रपती आणि नवे उपराष्ट्रपती मिळणार असल्याचे सांगितले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेश अत्यंत महत्वाचे असल्याचेही म्हटले. तसेच, “स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होणार आहे. १५ ऑगस्टचे विशेष महत्व आहे. तसेच, येणाऱ्या २५ वर्षात देश जेव्हा शताब्दी साजरी करेल. तेव्हा आपले २५ वर्षाचे धोरण कसे असेल. आपण किती वेगाने विकास करू, किती नवे शिखर गाठू याची संकल्पना करण्याचा हा कालखंड आहे. तसेच, या संकल्पांना लक्षात घेत देशाला दिशा देणे, देशाचे नेतृत्व करणे महत्वाचे आहे”, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

“यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. कारण या अधिवेशनावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकासाठी आज मतदानही होणार आहे. यानंतर देशाला नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती प्राप्त होणार आहेत”, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले. संसदेच पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात अग्निपथ योजनेसह विविध मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सेनेत गळती अद्याप कायम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही काही तासातच सोडचिट्टी

बडतर्फ केलेले ११९ कर्मचारी बँड लावून कामावर जातील, सदावर्तेंना ठाम विश्वास

Team Global News Marathi: