सेनेचा भाजपाला धक्का, रत्नागिरी जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष शशिकांत मोरे शिवसेनेत

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला गळती लागली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा माजी उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी संजय राऊत यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आश्वासनावर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतू दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, पेट्रोल- डिझे- गॅस सिलिंडरचे वाढते भाव हे पाहून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. तसेच विरोधकांचे नामोहरम करण्यासाठी ईडी व सीबीआय या यंत्रणेचा गरवापर देखील केला जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ शिवसेनाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देईल असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.

मोरे हे मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालकपदी कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षात काम करत असताना रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी यापूर्वी सांभाळला होता.

 

Team Global News Marathi: