‘अजित पवारांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन’

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून कर्मचारही आंदोलन करत असून अद्याप यावर तोडगा निघालेला नाहीये त्यातच आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती केली आहे. एसटी हे गोरगरीबांच्या प्रवासाचे साधन आहे. त्यांची ही सुविधा हिरावून घेऊ नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमच्या मागण्यांवर मदत करीत आहेत, पण आम्हाला हेच हवे.. तेच हवे.. असे करत तुटेपर्यंत ताणू नका राजांनो… असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले.

तसेच इतर राज्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना फायदे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण नेमकी चर्चा करायची कुणाशी? हाही एक मुद्दा आहे. कारण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी नको तर आमच्याशीच चर्चा करा, असा कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे चर्चा कुणाशी करायची यापेक्षा कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे यावे, सरकार दोन पावले पुढे येईल. त्यातून मार्ग काढू, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

एसटी संपावरून काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आझाद मैदानाबाहेर पडण्यास पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता. मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ काळी शाई फेकली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

Team Global News Marathi: