स्वत:च्या बुडाखाली काय जळतं ते पाहा, सामना अग्रलेखावरून आमदार नितेश राणे यांनी साधला निशाणा !

 

मुंबई | गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी भूपेंद्र पटेल यांनी एकट्यानेच शपथ घेतली. त्यामुळे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसारच उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि त्यांची खाती भुपेंद्र पटेल यांना ठरवावी लागणार आहेत. तसेच गुजरातच्या मुख्यमंत्री बदलावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. आता शिवसेनेच्या टीकेवर आमदार नितेश राणेंनी ट्विटरवरुन जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या या टीकेवर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन जोरदार टीका केली आहे. कोरोना कालावधीत मुंबई महापालिका आयुक्त परदेशी यांना तुम्ही का बदलले? असा सवाल राणे यांनी विचारला आहे. तसेच, स्वत:च्या बुडाखाली काय जळते, आधी ते बघा… असेही राणेंनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून हेच गुजरात मॉडेल! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला असून भाकरी फिरवावीच लागते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण, एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असा सवालही शिवसेनेनं विचारला आहे. यावरून आमदार नितेश राणे यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: