राजू शेट्टी तुम्ही धोतर नेसा, मध्यप्रदेशातील मुनीश्रींचा सल्ला !

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना पॅंट-शर्ट सोडा आणि धोतर नेसा असा सल्ला खुद्द जैन मुनी, संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराजांनी दिला आहे. महात्मा गांधीची धोतर नेसायचे, तुम्हीही नेसा, आपला देशी पेहराव करा, असे त्यांना खुद्द विद्यासागरजी महाराजांनी सांगितले आहे.

मध्यप्रदेशातील जबलपूर येथे मुनीश्रींचे राजू शेट्टींनी दर्शन घेतले. त्यावेळी मुनीश्रींनी शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना हा सल्ला दिला आहे. या देशात राजू शेट्टी यांनी एक वेगळे उदाहरण घालून दिले आहे. राजकारणात, निवडणुकीत मी पैसे वाटप होत असल्याचे ऐकले आहे. राजकीय नेते मतदान मिळवण्यासाठी पैसे वाटप करतात, नोटांचे बंडल खर्च करतात. दिल्लीपासून चेन्नईपर्यंत सगळीकडे हे चालते. पण, राजू शेट्टी असे नेते आहेत,

पुढे राजू शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की, ज्यांना मतदार स्वतः पैसे देतात. तुम्ही आमच्यासाठी कष्ट करता तर आमची जबाबदारी आहे, अशी मतदारांची भावना असते. असा नेता माझ्या पाहण्यात नाही. राजू शेट्टी मला भेटायला आले याचा आनंद झाला, ते का आले आहेत हे मला माहिती नाही. परंतू, त्यांनी केलेले पेहराव आपला नाही. त्यांनी पॅंट शर्ट वापरण्याऐवजी आता धोरत वापरावे. धोतर घालून चालताना माणूस कधीच पडत नाही असा सल्ला दिला होता.

Team Global News Marathi: