मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी अभियान सुरु करत आहे. या सभेपूर्वी रथाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. दगड मारुन या रथाच्या काचा देखील फोडण्यात आल्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी ही तोडफोड महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोशी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. पोलखोल रथ तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यासह नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते तसेच मुंबई मानपमध्ये भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.
या झालेल्या घोटाळ्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही रथ अभियानाची सुरुवात आज केली. आणि त्याच रथाची तोडफोड केली. तोडफोडीचा,आमचा सत्ताधाऱ्यांवर आरोप असल्याचं दरेकर स्पष्ट म्हणाले. पोलिसांनी तक्रार घेतली आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर उद्या पुन्हा पोलीस ठाण्याला घेराव घालणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.