“सविता मालपेकरांनी सांगितला छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील सोनसाखळी चोरीचा भयानक अनुभव”

 

मुंबई | दिग्गज अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळीची घटना छत्रपती शिवाजी महाराज पार्क ( शिवाजी पार्क) येथे घडली आहे. मुंबईतील दादरमध्ये शिवाजी पार्कसारख्या गजबजलेल्या भागात मालपेकरांच्या गळ्यातील चेन खेचून चोरट्याने पळ काढला. या अडलेल्या घटनेबद्दल सविता मालपेकरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सोमवार सविता मालपेकर यांची सोनसाखळी चोरीला गेली. या विषेय बोलताना त्या म्हणाल्या केली, “मी नेहमीच संध्याकाळी शिवाजी पार्कला वॉक करण्यासाठी येते. त्या दिवशीही संध्याकाळी साडेसात वाजता आले. पार्काला तीन राऊण्ड मारुन मी कट्ट्यावर बसले. त्यावेळी सदर व्यक्तीने मला वेळ विचारली होती.माझ्याकडे घड्याळ नाही असे सांगितल्यावर तो म्हणाला तुमच्या मोबाईलमध्ये बघा ना. मी म्हटलं मी फोनवर बोलत आहे, मी नाही बघणार. त्यावर तो निघून गेला आणि मी बोलायला लागले. त्यानंतर दहा मिनिटांनी तो मागून आला असं सविता मालपेकर सांगत होत्या.

“अचानक, धपकन माझ्या पाठीवर हात आला. मला आधी वाटलं एखादा मोठा कुत्रा माझ्यावर हल्ला करतोय की काय. मी बघायला मागे वळले, तोच तो कट्ट्यावरुन उडी मारुन समोरच्या बाजूला आला. त्याने जवळच बाईक लावली होती. तो सोनसाखळी खेचून बाईकवरुन पसार झाला. शिवाजी पार्कला नेहमी गर्दी असते, पण पावसामुळे त्या दिवशी फार वर्दळ नव्हती. जी काही मुलं होती, ती धावत त्याच्या मागे गेली, पण तो सापडला नाही. पण शिवाजी पार्क पोलिसांचे आभार, त्यांची गाडी एका मिनिटात तिथे आली” असं मालपेकरांनी सांगितलं.

“त्याने इतक्या जोरात खेचलं होतं, की माझा ड्रेस फाटला. एका मुलाने मला जॅकेट दिलं. त्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून मी पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी मला त्याचा फोटो दाखवला, मी त्याच्याशी बोलले असल्यामुळे त्याला लगेच ओळखलं. त्याने डोक्याला पांढरा रुमाल लावला होता, आणि मास्क घातला होता. आपली पोलीस यंत्रणा अत्यंत तत्पर आहे. ते आरोपीला लगेचच बेड्या ठोकतील” असा विश्वास सविता मालपेकर यांनी व्यक्त केला. सगळ्या गेटसह मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, त्यामुळे सोनसाखळी चोरतानाची घटनाही त्यात कैद झाली असती, अशी मागणी त्यांनी केली.

Team Global News Marathi: